राज्यात यापुढे लॉकडाऊन वाढणार की नाही ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

राज्यात यापुढे लॉकडाऊन वाढणार की नाही ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (26 जून) पुण्यात महत्त्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे, राज्यात यापुढं लॉकडाऊन नसणार आहे. आता केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल. राज्यात अनलॉक 2-3 असेल असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.  No more lockdown in the state, Health Minister Rajesh Tope's big announcement in Pune


राज्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत याची नाही चिंता नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढत आहे, याबाबत आहे, असेही टोपेंनी यावेळी सांगितलं. कोरोनामुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.


महाराष्ट्र, मुंबई पुण्यामध्ये चाचण्या कमी झाल्या यात तथ्य नसल्यांचंही ते म्हणाले. 1 लाखामागे मुंबईत 22 हजार आणि पुण्यात 15 हजार चाचण्या होत आहेत. काही रुग्ण मृत झाल्यानंतर कोरोना पॉजिटिव्ह येत असल्यानं त्यांची संख्या नंतर वाढत आहे

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment