शेतात तुटून पडलेल्या तारेचा शॉक लागून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

शेतात तुटून पडलेल्या तारेचा शॉक लागून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील विज वितरण कंपनीची शेतामध्ये तुटून पडलेल्या तारेचा ९ वर्षीय मुलाला शॉक लागल्याने तो जागेवर मयत झाला. विनायक तानाजी घोडके असे त्या मृत मुलाचे नाव आहे.


दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. यातील मयत मुलगा विनायक घोडके हा बोराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ४ थी च्या वर्गात शिकत होता.दि.२६ रोजी सायंकाळी ४.०० वा. भिमराव घोडके यांच्या गट नं .६८० मधील शेतामध्ये इलेक्ट्रीक पोलवरील तार तुटून पडली होती.

त्या तारेत करंट उतरल्याने सदर मुलास शॉक लागल्याने तो जागीच मयत झाला.याची खबर बाबासाहेब दगडू घोडके यांनी पोलिसात दिली आहे.


या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान या घटनेत विज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mangalwedha borale Nine year old boy died after being hit by a broken star in a field

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment