बाप रे ! सोलापुरात आज 39 नवे रुग्ण ; 9 जणांचा बळी - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 21, 2020

बाप रे ! सोलापुरात आज 39 नवे रुग्ण ; 9 जणांचा बळी


मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करुनही सोलापुरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र पुन्हा पहायला मिळाले. रविवारी (ता. 21) शहरातील 70 वर्षांवरील सहा तर 58 वर्षांवरील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 222 अहवालात 39 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या कमी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्‍त करुनही शहरातील मृतांची संख्या आता 170 वर पोहचली आहे. Solapur city corona virus updated

रविवारी या भागात सापडले 39 रुग्ण

अवंतीनगर, भवानी पेठ, अवैद्यनगर हैदराबाद रोड, मोदी, रुपाभवानी मंदिराजवळ, जुना विडी घरकूल, बिलाल नगर, जुळे सोलापूर, माशाळ वस्ती, उपलप मंगल कर्यालयाजवळ, आनंद नगर, विजयपूर रोड, चंद्रकिरण अर्पाटमेंट, एम्पलॉयमेंट चौक, अशोक नगर, विजयपूर रोड, पद्मानगर, अक्‍कलकोट रोड, मनपा मुलांची शाळा क्र.4, उत्तर कसबा, टिळक चौक, नियर गणपती मंदिराजळव, उत्तर कसबा, सिध्देश्‍वर नगर, वसंतराव नाईक शाळेजवळ, उत्तर कसबा, तनिष्क रेसिडेन्सी, भवानी पेठ, स्वामी विवेकानंद नगर, दत्तर मंदिराजवळ, कळके वस्ती, सिध्देश्‍वर नगर, भवानी पेठ, इरण्णा वस्ती, वांगी रोड, गीता नगर, दाजीपेठ, जयलक्ष्मी नगर, शेळगी, नटराज नगर, मंत्री चंडक, माणिकचंद अर्पाटमेंटजवळ, गांधीनगर, बॉईज हॉस्टेल, सिव्हिल कॉर्टर, चंडक हायस्कूलजवळ, निलम नगर, महात्मा गांधी चौक, न्यू बुधवार पेठ, सुभाष नगर, मजरेवाडी भाग-1, स्वामी विवेकानंद नगर, हत्तरे वस्ती, पूर्व मंगळवार पेठ आणि शुक्रवार पेठ या ठिकाणी रविवारी (ता.21) नवे 39 रुग्ण सापडले आहेत.


मयतांमध्ये 70 वर्षांवरील सहाजण तर 58 वर्षांवरील तिघे

रविवारी सोलापुरात कोरोनाबाधित 39 रुग्णांची भर पडली. दुसरीकडे नऊ व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शनिवार पेठेतील 70 वर्षाची महिला, बुधवार पेठेतील 71 वर्षांचे पुरुष, करंजकर सोसायटी, शेळगी येथील 77 वर्षांचे पुरुष, मुरारजी पेठेतील 72 वर्षांची महिला आणि ब्रह्मनाथ नगर, जुना विडी घरकूलमधील 73 वर्षीय पुरुषाचा आणि शास्त्री नगरातील एका 79 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर भवानी पेठेतील 58 वर्षीय महिला, जोडभावी पेठेतील 65 वर्षीय पुरुष आणि बुधलेगल्ली, मंगळवार पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment