विवाह होण्याच्या आदल्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 29, 2020

विवाह होण्याच्या आदल्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या


टीम मंगळवेढा टाइम्स । मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील मारुती पांडुरंग डोके (वय.26,रा. पेनूर, ता. मोहोळ) या युवकाने विवाहासाठी होणाऱ्या खर्चाच्या तणावातून दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजण्यापूर्वी घडली आहे.  Mohol Penur A young man commits suicide due to the stress of marriage expenses


या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. विवाह होण्याच्या आदल्या दिवशीच मारुतीच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पेनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती डोके हा युवक दूध विक्रीचा व्यवसाय करीत होता. 30 जून रोजी त्याचा विवाह होणार होता. मात्र विवाह सोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चाचा मारूती डोके याच्यावर तणाव होता.


रविवारी रात्री दहा वाजता तो जेवण करून आपल्या खोलीत झोपला होता. सोमवारी पहाटे सव्वा चार वाजता त्याचे वडील त्याला झोपेतून उठवायला गेले असता मारुती याने घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.त्याला तात्काळ उपचारासाठी मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.

या प्रकरणी पांडुरंग डोके यांनी मोहोळ पोलिसात माहिती दिली असून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब ओहोळ करीत आहेत. विवाह होण्याच्या आदल्या दिवशीच मारुतीच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पेनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment