संगीतकार वाजीद खानचे निधन ; संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

संगीतकार वाजीद खानचे निधन ; संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात
टीम मंगळवेढा टाईम्स । बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचं मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झालं आहे. ते 42 वर्षांचे होते.


वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत.


साजिद-वाजिद या जोडगोळीने १९९८ मध्ये सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या मधून सुरुवात केली होती. यानंतर गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग सारख्या सिनेमांच्या गाण्यांची रचना केली होती.

वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. त्यांनी सध्या लॉकडाऊन काळात सलमानचे प्यार करोना आणि भाई भाई गाणेही कंपोझ केले होते.

Musician Wajid Khan dies The whole of Bollywood is in mourning

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा