मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली ; बाबा रामदेव म्हणाले - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली ; बाबा रामदेव म्हणाले


मंगळवेढा टाईम्स टीम । कोरनावरील औषधासंदर्भात मंगळवारी पतंजलीने दावा केला होता. यानंतर, आयुष मंत्रालयाने पतंजलीचा हा दावा गाभीर्याने घेत, कंपनीचा दावा आणि सायंटिफिक स्टडीसंदर्भात मंत्रालयाकडे कुठलीही माहिती पोहोचलेली नही, असे म्हटले होते. यावर, 'आम्ही मंजुरी घेऊनच क्लिनिकल ट्रायल केले', असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. Modi government stops advertisement of Patanjali's Corona drug ; Baba Ramdev said

एका वृत्त वाहिनीशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले, हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारे आणि आयुर्वेदाचा गौरव करणारे आहे. जो कम्युनिकेशन गॅप होता, तो दूर झाला आहे आणि Randomised Placebo Controlled Clinical Trials चे जेवढे स्टॅन्डर्ड पॅरामीटर्स आहेत, ते सर्व 100% पूर्ण केले आहेत. यासंदर्भात आम्ही संपूर्ण माहिती आयुष मंत्रालयाला दिली आहे.

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले, एवढे मोठे काम केले आहे, एवढेसे प्रश्न तर निर्माण होणारच, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे सरकार आयुर्वेद विरोधी नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच पुढच्या कामाला सुरुवात झाली. रजिस्ट्रेशन नंबरही देण्यात आला आहे. आम्ही क्लिनिकल ट्रालयसाठी सरकारने निर्धारित केलेल्या सर्व मापदंडांचे 100% पालन केले आहे. जे अप्रुव्हल घेणे आवश्यक होते, ते घेतले आहे. मला वाटते, थोडा कम्युनिकेशन गॅप होता. तो आता संपला आहे. आता यात काहीही दुमत नाही. यासंदर्भात आचार्य रामकृष्ण यांनीही एक ट्विट केले आहे.

No comments:

Post a Comment