Golden opportunity : मोदी सरकार देतंय घरबसल्या 1 लाख जिंकण्याची संधी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

Golden opportunity : मोदी सरकार देतंय घरबसल्या 1 लाख जिंकण्याची संधी


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातील, जगातील स्थिती पाहता यावर्षी जागतिक योग दिवस संपूर्ण जगात डिजिटल प्लॅटफॉर्मवर साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक परिषदचे (I.C.C.R.) अध्‍यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आयुष मंत्रालयासोबत आयोजित एका परिषदेत याबाबत माहिती दिली. 


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी जागतिक योग दिनी कोणत्याही जनसभेचं आयोजन करण्यात येणार नाही. त्यामुळे आयुष मंत्रालयाकडून जनतेला आपल्या कुटुंबियांसह घरातच योगाभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना ‘MyLifeMyYoga’ या व्हि.डि.ओ. ब्लॉगिंग स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.


या व्हि.डि.ओ. ब्लॉगिंग स्पर्धेद्वारे आयुष मंत्रालय आणि आय.सी.सी.आर. योगाबद्दल जागरुकता वाढवण्यास आणि लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या स्पर्धेबाबत लोकांचा उत्साह वाढला असल्याचं, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितलं. योग संस्था, योग स्टुडिओ, योग प्रोफेशनल्स यासारख्या सर्वांना, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध प्लॅटफॉर्मवरुन ब्लॉगिंग स्पर्धेविषयी जागरुक केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Modi government gives a chance to win 1 lakh at home

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा