धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या


मंगळवेढा टाईम्स टीम । सामूहिक आत्महत्येनं पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे. या दाम्पत्यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सामूहिक आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अतुल शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघाजणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ  Bharati University पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे. Pune Four members of the same family commit suicide by hanging

अतुल दत्तात्रय शिंदे वय ३३ वर्ष, जया अतुल शिंदे वय ३२ वर्ष , ऋग्वेद अतुल शिंदे वय ६ वर्ष आणि अंतरा अतुल शिंदे वय ३ वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे कुटुंबीयांनी घर उघडलं नव्हतं. त्यांचा कुणात वावरही नव्हता आणि काहीही हालचाली दिसून येत नव्हत्या.

शिवाय या कुटुंबातील कुणीही फोन उचलत नव्हते आणि व्हॉट्सअॅपलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे संशय आल्याने शेजाऱ्यांनी काल रात्री पोलिसांना फोन करून कळवले. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे कुटुंबीयांना बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्याने पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश करताच त्यांना समोरच या चौघांचेही लटकलेले मृतदेह दिसले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पंचनामा केला असून आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.

 (Pune Family Commits Suicide Couple Hangs self after killing Children)

No comments:

Post a Comment