मंगळवेढ्यातून विवाहित महिला बेपत्ता - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

मंगळवेढ्यातून विवाहित महिला बेपत्ता


टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील किल्ला भागातून २४ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे.तीच्या पतीने याबाबत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली असून पोलिस त्या बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत. Married woman disappears from mangalwedha killa bhag


या घटनेची हकिकत अशी , शहरातील किल्ला भागातून यातील २४ वर्षीय विवाहित महिला ही दि . २५ रोजी सकाळी १०.०० वा . घरच्यांना पोटात दुखत आहे मी सरकारी दवाखान्यात जावून येते असे सांगून घराच्या बाहेर पडली ती रात्री उशीरापर्यंत घराकडे न परतल्याने सर्वत्र तीच्या नातेवाईकांनी शोध घेतला.


मात्र ती मिळून आली नाही.बेपत्ता महिलेचे वर्णन -५ फुट उंच , अंगाने सडपातळ , रंग सावळा , चेहरा गोल , नाक सरळ , अंगात गुलाबी रंगाची साडी , पिवळा ब्लाऊज अशा वर्णनाची महिला कुणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment