मंगळवेढयातील मंदोदरी वाकडे उपशिक्षणाधिकारी - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 20, 2020

मंगळवेढयातील मंदोदरी वाकडे उपशिक्षणाधिकारी


समाधान फुगारे । राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत मंगळवेढा येथील मंदोदरी अप्पासाहेब वाकडे यांनी यश संपादन केले असून त्यांची उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली. Mandodari Wakde Deputy Education Officer

त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी हायस्कूल Shri Sant Damaji High School येथे तर महाविद्यालयीन शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालयात Sant Damaji College झाले.

एमआयटी कॉलेज , पुणे या ठिकाणी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकसेवा आयोगाची तयारी केली . त्यामध्ये यशस्वी होऊन मंत्रालयामध्ये वित्त विभागात सहायक कक्षाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत.

त्यांच्या यशाबद्दल MLA Bharat Bhalke आमदार भारत भालके , MLA Prashant Paricharak, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे , Mayor Aruna Mali नगराध्यक्षा अरुणा माळी, पक्षनेते अजित जगताप , विद्या विकास मंडळ संस्थेचे राहुल शहा, प्राचार्य एन.बी. पवार , तालुका अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे , रामचंद्र वाकडे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment