ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला ; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला ; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका


टीम मंगळवेढा टाईम्स।  ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला झाला आहे. सरकारसह खासगी क्षेत्रावर निशाणा साधण्यात आला असून त्यांना मोठा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला संघटीत गँगकडून करण्यात आला आहे किंवा त्यामागे एखादा देश असू शकतो याचा तपास सध्या करण्यात येत आहे. Major cyber attack on Australia;  The government and the private sector have also been hit

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांना लक्ष्य करुन कोणत्यातरी परदेशी संस्थेने हा मोठा सायबर हल्ला केला आहे. तसेच आम्हाला माहीत आहे की हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे.

हा सायबर हल्ला कोणत्या मार्गाने केला गेला आणि त्याचे लक्ष्य असलेल्या संस्थांवर आणि मोठ्या प्रमाणात होणारा परिणाम स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियन सरकार या सायबर हल्ल्यांच्या धोक्याबाबत सावध व सतर्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment