मंगळवेढ्यातील महावितरण कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

मंगळवेढ्यातील महावितरण कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यूमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बुद्रूक) येथील 33 के.व्ही. केंद्रांतर्गत वीजपुरवठा केलेल्या चिक्कलगी येथील खताळ डी. पी.वर वीज दुरुस्तीचे काम करताना महावितरणच्या बहिस्थ कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चिक्कलगी परिसरात घडली.  MSCB employee dies of electric shock mangalwedha

चिक्कलगी येथील सिद्धेश्‍वर शिवाजी कोळी (वय 27) हे महावितरणच्या कामावर मनुष्यबळ पुरवल्या जाणाऱ्या ठेकेदाराकडे कामाला होते. त्याच्या घराशेजारी असलेल्या जंगलगी येथील शेती पंपाच्या खताळ डी. पी.वरील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढला.

अचानक विद्युत प्रवाह सुरू होऊन तो भाजून गंभीर जखमी झाला. याबाबत उपचारासाठी त्याला मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.

कोरोना आणि पावसाळा या दोन्ही संकटाचे महावितरणचे कर्मचारी मोठ्या धैर्याने लढत असताना एखाद्या गंभीर घटनेच्या यादरम्यान महावितरणचे वरिष्ठ कोणतेही अधिकारी अंतिम संस्कार प्रसंगी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

------------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment