Cricket Team । भारतीय खेळाडूंची आलिशान घरं - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

Cricket Team । भारतीय खेळाडूंची आलिशान घरं


तात्यासो कोंडूभैरी । कोरोना लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचे क्रिकेटपटू त्यांच्या घरामध्येच आहेत. घरातूनच हे क्रिकेटपटू त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. यामुळे क्रिकेटपटूंची आलिशान घरंही त्यांच्या चाहत्यांना पाहण्याची संधी मिळत आहे.


विराट कोहली  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने काही महिन्यांपूर्वीच मुंबई मध्ये युवराज सिंगच्या बाजूला घर खरेदी केलं. या घराची किंमत ३४ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. विराट कोहली दिल्लीचा असल्यामुळे तिकडेही त्याचा एक बंगला आहे. शिवाय दिल्लीमध्येच विराटने आणखी एक नवीन घर विकत घेतलं आहे. हे घरं ५०० स्क्वेयर यार्डात बनवण्यात आलं आहे. विराटच्या या घरात जिम, स्विमिंग पूल, पार्किंग आणि गार्डन या सुविधाही आहेत. 

 सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुंबईच्या वांद्रे भागात ५ मजली आलिशान बंगला आहे. सचिनचे हे घर जवळपास ६ हजार स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. सचिनच्या घरात स्वीमिंग पूलपासून पार्किंगच्या सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत. 

 हरभजन सिंग भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगचं घरही आलिशान आहे. हरभजन सिंगचा हा बंगला चंडीगडमध्ये आहे. भज्जीचं घर २ हजार स्केयर यार्डात पसरलं आहे.

    महेंद्रसिंग धोनी  टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धोनीचं घर रांचीमध्ये आहे. धोनीने स्वत:च त्याच्या बंगल्याचं डिझाईन केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा