विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 24 जून रोजी सोलापूर दौर्याधवर येत असून, ते सोलापुरातील कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा तसेच कोरोना रुग्णांशी संवाद साधणार आहेत. Leader of Opposition Devendra Fadnavis on a visit to Solapur today

फडणवीस हे बुधवारी दुपारी सोलापुरात दाखल होणार आहेत. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना रुग्णांशी संवाद साधणार आहेत.

तसेच,आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेतला जाणार आहे. वोरोनोको प्रशालेत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या रक्तनदान शिबिराला ते भेट देणार आहेत.

येथील हेरिटेज मंगल कार्यालयात दुपारी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते मोटारीने पुण्याकडे रवाना होणार आहेत.

No comments:

Post a Comment