सोलापूर ग्रामीण भागात 'या' तालुक्यात खाते उघडले ; अक्कलकोट मध्ये वाढता आलेख - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

सोलापूर ग्रामीण भागात 'या' तालुक्यात खाते उघडले ; अक्कलकोट मध्ये वाढता आलेखटीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी २०४ झाली असून आज ८ नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात अक्कलकोट तालुक्यातील ७ तर एक करमाळा तालुक्यातील झरे येथील आहे. Karmalya opened an account in rural Solapur;  Growing graph in Akkalkot

आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) १०७ जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८ पॉझिटिव्ह आहेत तर ९९ निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २०४ झाली आहे. ( यात एक रूग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला आहे ).

कोरोनामुळे जिल्ह्यात ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून ८७ जण घरी परतले आहेत . १०६ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आज करमाळा तालुक्यातील झरे येथे १ रुग्ण आढळून आला आहे . ही व्यक्ती ठाणे येथून आली आहे.

तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः

अक्कलकोट ३७ , बार्शी ३० , करमाळा १ , माढा ७ , माळशिरस ५ , मोहोळ १० , उत्तर सोलापूर १३ , पंढरपूर ७ , सांगोला ३ , दक्षिण सोलापूर ९१.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment