सोलापूर ब्रेकिंग : जावयाच्या संपर्कात आलेल्या सासऱ्यास कोरोनाची लागण - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

सोलापूर ब्रेकिंग : जावयाच्या संपर्कात आलेल्या सासऱ्यास कोरोनाची लागण


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना महामारीने सोलापूर शहरात कहर केला असून आता ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला असून पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे पुण्यावरून आलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे.तो व्यक्ती जावयाच्या संपर्कात आल्याने त्याच्या सासऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे.


पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे बुधवारी कोरोनाग्रस्त आढळला होता.त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वब नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल आला असून त्यापैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


करकंब येथे बाहेरगावाहून आलेल्या व संस्थात्मक विलगीकरणातील ठेवलेल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला होता.यानंतर करकंब व परिसरातील ३९ लोकांचे स्वब नमुने तपासणीसाठी घेतले होते.


शहर व तालुक्यात आता एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने पंढरपूर , उपरी , गोपाळपूर तसेच चळे येथील ४७ जणांचे स्वब नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग , महसूल प्रशासन , नगरपालिका प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था अहोरात्र झटत आहे.


तालुक्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. या नागरिकांनी स्वत : च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने वागावे. सर्वच नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले आहे.

solapur pandharpur karakamb corona victim's father-in-law's report came positive

----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा