जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करून सोलापुरातील जवान शहीद - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करून सोलापुरातील जवान शहीद


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पुलवामा (Pulwama) इथं दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे CRPF जवान सुनिल काळे यांना वीरमरण Veermaran to Sunil Kale प्राप्त झाले.

एकीकडे चीन सीमारेषेवर थयथयाट करत आहे तर दुसरीकडे पाकच्या कुरापत्या सुरूच आहे. आज सकाळी पुलवामा मध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं होतं.  भारतीय सुरक्षा दलाच्या (Indian security force) जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारलं. या चकमकीत आपला एक जवान शहीद झाला.

दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे रहिवासी सुनील काळे यांना वीरमरण आलं. सुनिल काळे यांनी आज  पहाटे 4.30 वाजता झालेल्या चकमकीत 2 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सुनिल काळे शहीद झाले. सुनिल काळे शहीद झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.


दरम्यान, पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. अनेक दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे.

Jawan martyred in Solapur after eliminating militants in Jammu and Kashmir

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment