जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये धुमश्चक्री आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये धुमश्चक्री आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान


टीम मंगळवेढा टाईम्स।  जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील मुनांद परिसरात सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यातील एका दहशतवाद्याला काल ठार करण्यात आले आहे. तर, येथे अद्यापही मोठ्याप्रमाणात चकमक सुरू आहे. जवानांच्या माहितीनुसार या ठिकाणी आणखी दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात जवानांनी वेढा दिलेला आहे. Jammu and Kashmir: Five terrorists have been nabbed in Shopian so far


याशिवाय जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे देखील आज पहाटे मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. काल (गुरुवारी) या ठिकाणी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं.

अवंतीपोरा भागात काल दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या ५० आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांचा याची जाणीव होताच त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुरूवातीस जवानांकडून दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरी देखील दहशतवद्यांकडून गोळीबार सुरू राहिल्याने, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. तर अन्य दोघेजण मशीदीत घुसले होते.

आज सकाळी देखील जवानांकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र दहशतवादी ऐकत नसल्याचे दिसताच, स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) कमांडो मशीदत घुसले व दोन्ही दशतवद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment