रेडझोनमधून मंगळवेढयात आलेल्या 68 नागरिकांना केल इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ३ जून, २०२०

रेडझोनमधून मंगळवेढयात आलेल्या 68 नागरिकांना केल इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन


टीम मंगळवेढा टाईम्स । बाहेरच्या राज्यातून व जिल्हयातून मंगळवेढयात आलेल्या परवानाधारक 68 नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करून इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान,हे सर्व नागरिक मुंबई,पुणेसारख्या रेडझोनमधून आले असल्याने कोरोना या संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.


कोरोना या संसर्गजन्य साथीने सर्वत्र हाहाकार माजविला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना आपल्या मूळ गावी जाता यावे यासाठी वैद्यकीय तपासणी करून ऑनलाईन परवाना देण्याचे निश्चित केल्याने नागरिकांनी हा परवाना काढून मुंबई,पुणे,विजापूर,पनवेल,आळंदी,नागपूर,कोल्हापूर, पिंपरी चिंचवड यासह रेड झोन परिसरातून हे नागरिक मंगळवेढयात दाखल झाले आहेत.


यांची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना मंगळवेढा शहरातील  नागणेवाडी येथेअसलेल्या महिला बचत गट इमारत, जवाहरलाल हायस्कूल,नगरपालिका मुलांची व मुलींची शाळा नं.1 व 2,शनिवार पेठेतील नगरपालिका शाळा आदी ठिकाणी 68 व्यक्तींना इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन तर 56 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.


इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर आरोग्य खाते लक्ष ठेवून आहे दररोज त्यांच्या शारिरीक तपमानाची तपासणी व सर्दी,खोकला याबाबत चौकशी केली जात आहे.प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मुंबई येथून रेड झोनमधून आलेल्या शेलेवाडी येथील इसमाचा मृत्यू झाला होता.या इसमाला पंढरपूर तालुक्यात इस्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते.या इसमाचा मृत्यू झाल्यानंतर गोणेवाडी येथे पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने तेथील तीन व्यक्तींना मंगळवेढा येथील तुकाईनगर परिसरात असलेल्या वसतीगृहात इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Institutional quarantine of 68 citizens who came to mangalwedha from the red zone

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा