सोलापुरात बजाज फायनान्स कडून ग्राहकांना कर्जाच्या हप्त्यासाठी मुभा - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

सोलापुरात बजाज फायनान्स कडून ग्राहकांना कर्जाच्या हप्त्यासाठी मुभा


सुरज फुगारे । बजाज फायनान्स लिमिटेड ( बीएफएल ) आपल्या सातत्यपूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकांना कर्जफेड पुढे ढकलण्याची सोय देऊ करत आहे.कोणत्याही कर्जात दोनपेक्षा अधिक हप्ते फेडायचे राहिलेले नाहीत अशा ग्राहकांना मार्च , एप्रिल आणि मे २०२० या महिन्यांमध्ये हप्ते न भरण्याची मुभा देण्यात येत आहे.

मात्र , १ मार्च २०२० नंतर ज्यांचे कर्ज मंजूर झाले आहे ते ग्राहक या सुविधेसाठी म्हणजेच मोरेटोरिअमसाठी पात्र नसतील.या सुविधेचा लाभ ग्राहकांना कसा घेता येईल ? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी | आपल्या कर्ज खात्याच्या माहितीसह या सुविधेचा लाभ मागण्याचे कारण बीएफएलला  https://customer-login.bajajfinserv.in/Customer?Source=Raise ur fachar  लॉग इन करून मान्यता मिळवता येईल.रीक्वेस्ट या विभागात प्रोडक्टमध्ये कोविड -१ ९ निवडा.

त्यानंतर कर्जाची माहिती निवडा , सर्व  अटीशर्थी काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही मान्यता दिलीत की तुमची विनंती नोंदवली जाईल.

In Solapur, Bajaj Finance allows customers to repay their loans

No comments:

Post a Comment