मंगळवेढा ब्रेकिंग : डॉक्टरकडून नर्सवर रुग्णालयात बलात्कार ; नर्सने घेतले पेटवून - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १८ जून, २०२०

मंगळवेढा ब्रेकिंग : डॉक्टरकडून नर्सवर रुग्णालयात बलात्कार ; नर्सने घेतले पेटवूनमंगळवेढा टाईम्स टीम । आपल्या रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सला तुला आयुष्यभर संभाळेन हे अमिष दाखवून तिच्यावर डॉक्टरने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.  Mangalwedha Hospital rape of nurse by doctor ; The nurse took the lit.

तू मला खूप आवडते, मी तुला आयुष्यभर सांभाळतो असे म्हणत डॉ.प्रशांत नकाते यांनी फिर्यादी नर्सशी वारंवार शरीर संबध ठेवल्याने नर्सने दवाखाण्यात पेट्रोल अंगावर ओतुन घेवुन पेटवुन घेतले असल्याची घटना आज  मंगळवेढा शहरात घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी समर्थ हॉस्पीटल मुरलीधर चौक मंगळवेढा ( Samarth Hospital Muralidhar Chowk Mangalvedha ) येथे ऑक्टोबर 2017 पासुन कामास होती.डॉ.प्रशांत प्रभाकर नकाते ( Dr.Prashant Prabhakar Nakate ) यांनी फिर्यादीस मला तु मला खुप आवडते तुला मी आयुष्यभर संभाळेन असे म्हणून दिनांक 05/06/2019 रोजी पासुन ते दिनांक 26/04/2020 रोजी पर्यंत समर्थ हॉस्पीटल मंगळवेढा येथे माझ्या इच्छेविरूष्ट वेळोवेळी शरीर संबध ठेवले.

तसेच त्याच्या पासुन फिर्यादिस दिवस गेल्याने आरोपीने जबरदस्तीने गोळ्या देवुन फिर्यादीचा गर्भपात केला आहे व कोणास काही सांगितल्यास तुला व तुझ्या घरातील लोकाना मारून टाकतो अशी धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

Mangalwedha Hospital rape of nurse by doctor;  The nurse took the lit
.
----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा