अक्कलकोट रस्त्यावरील अपघातात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

अक्कलकोट रस्त्यावरील अपघातात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । अक्कलकोट रस्त्यावर आज रात्री झालेल्या कार व दुचाकी अपघातात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.अपघातात जिल्हा परिषद कर्मचारी गौसपाशा इमामभाई बागवान (रा. सलगर, ता. अक्कलकोट) यांचा मृत्यू झाला.  Health department employee killed in Akkalkot road accident solapur

ते आपले काम संपवून जिल्हा परिषदेहून आपल्या गावाकडे निघाले असता, त्यांच्या दुचाकीला कार (एमएच 15 सीटी 9783)ची धडक बसली. त्यात बागवान यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अक्कलकोट शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

No comments:

Post a Comment