मुख्यमंत्र्यांचं नाव घेताना सोलापूरचे पालकमंत्री चुकले; काय म्हणाले ते पहा - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

मुख्यमंत्र्यांचं नाव घेताना सोलापूरचे पालकमंत्री चुकले; काय म्हणाले ते पहा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चक्क माजी मुख्यमंत्री व राज्याच्या विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख केला. 

सोलापुरातील कोरोना स्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. The Guardian Minister dattatray bharane of Solapur made a mistake in naming the Chief Minister


जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा प्रकार घडला. राज्यातील नाभिक समाजाच्या प्रश्‍नाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना


सोलापूरचे पालकमंत्री भरणे म्हणाले, हा प्रश्‍न मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे. आपल्याकडून मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव उच्चारले गेले असल्याचे पालकमंत्री भरणे यांच्या लक्षात आले. त्यांनी अवघ्या काही क्षणातच स्वत:ला सावरत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असा उल्लेख केला. मुख्यमंत्री फडणवीस असा उल्लेख करताच बाजूला थांबलेल्या कार्यकर्त्यांचेही चेहरे अवाक्‌ झाले होते.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment