गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवारांबद्दलच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवारांबद्दलच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत. After Gopichand Padalkar's statement about Sharad Pawar, NCP is aggressive

'पडळकर यांनी शरद पवारांविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजप असहमत नाही, पण त्यांनी जो शब्दप्रयोग वापरला, तो १०० टक्के चूक आहे. भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांच्या राजकीय धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत.


आम्ही त्यांच्यावर टीका केली आणि यापुढेही करू, पण सार्वजनिक जीवनात असताना, कोणावरही अशी टीका करणं ही भाजपची परंपरा नाही,' असं भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर म्हणाले आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्यावर टीका करताना काळजी घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment