सोलापूर ग्रामीण भागासाठी चांगली बातमी ; आज एकही पॉझिटिव्ह आढळला नाही - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २ जून, २०२०

सोलापूर ग्रामीण भागासाठी चांगली बातमी ; आज एकही पॉझिटिव्ह आढळला नाही


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आजच्या दिवशी चांगली बातमी आहे.आज मंगळवारी एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही , तर एकाही संसर्गित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


जिल्ह्यातील ग्रामीण भागात 43 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.यातील एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह .त्यामध्ये 26 पुरुष तर 17 महिलांचा समावेश आहे.आज पर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 32 जणांवर उपचार सुरू आहेत.


उपचार सुरू असलेल्यामध्ये 18 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींमध्ये चार पुरुष तर 1 महिलेचा समावेश होतो.


सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 327 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 हजार 297 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये हे 1 हजार 255 निगेटिव्ह तर 42 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आज मंगळवारी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले त्या पैकी सात ही जण निगेटिव्ह आढळून आले आहेत संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमधून आज 77 जणांना सोडण्यात आले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कायलियाने दिली आहे.

No positive was found in Solapur rural area

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा