चिंताजनक : सोलापुरात कोरोनाचे मृत्यू थांबेनात ; सोमवारी दोघांचा बळी, 48 नवे रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

चिंताजनक : सोलापुरात कोरोनाचे मृत्यू थांबेनात ; सोमवारी दोघांचा बळी, 48 नवे रुग्ण


मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर शहरातील विविध भागात सोमवारी  48 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर बाळे तोडकर वस्ती येथील 60 वर्षीय पुरुष आणि चाकोते पेट्रोल पंपाजवळील भवानी पेठ परिसरातील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  48 patients found in Solapur on Monday, two over 60 years of age died


सोलापुरात आतापर्यंत अवघ्या 11 हजार 981 व्यक्‍तींचीच स्त्राव नमुने चाचणी झाली आहे. त्यापैकी दोन हजार 265 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी 211 पैकी 163 अहवाल निगेटिव्ह आले. तर 57 व्यक्‍तींनी कोरोनावर यशस्वी मात करीत घर गाठले. दरम्यान, शहरातील मृत्यूची संख्या आता 247 झाली आहे.
सापडलेले 48 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण 'या' परिसरातील


विरशैव नगर, प्रसाद नगर, जुळे सोलापूर, शुक्रवार पेठ, 70 फूट रोड, श्रध्दा विहार अर्पाटमेंट, मोदी, वसंतराव नाईक नगर, विजयपूर रोड, वसंत विहार, मनपा कॉलनी, सात रस्ता, हुडको नगर, कुमठा नाका, महानंद नगर, एमआयडीसी, वाडी गल्ली, दत्त मंदिराजवळ, देगाव रोड, गांधी नगर, विद्या नगर, सलगर वस्ती, भवानी पेठ, रेल्वे लाईन, डफरीन, जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ, गीता नगर, जोशी गल्ली, शेळगी, जगदंबा चौक, उत्तर सदर बझार, दमाणी नगर, आनंद नगर, मजरेवाडी,

मोदी, नवनाथ नगर, न्यू पाच्छा पेठ, विजय नगर, धाकटा राजवाडा,शिवगंगा नगर, शेळगी, अमृता नगर, विजयपूर रोड, युनायटेड ग्रीन, मजरेवाडी, निर्मिती सोसायटी, राजस्वनगर, कल्याण नगर, सेव्हन हिल, रेल्वे लाईन, चौपाड, रंगरेज नगर, घरकूल, लतादेवी हुच्चेश्‍वर मठाजवळ, रेल्वे लाईन, हत्तुरे वस्ती, काजल नगर, होटगी रोड, कुर्बान हुसेन नगर या ठिकाणी सोमवारी 48 रुग्ण सापडले आहेत.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment