बार्शी व वैरागमध्ये आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

बार्शी व वैरागमध्ये आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण


विनोद ननवरे । बार्शी शहरात दोन आणि वैरागमध्ये दोन असे आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ३६ झाली आहे.  Four more corona positive patients in Barshi, Vairag solapur

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने आजचे चारही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . ग्रामीण पोलीस दलातील दोन तर वैराग येथील दोन असे चारजण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३६ वर गेली आहे . सकाळच्या सत्रात निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर बार्शीकरांना दिलासा मिळाला होता.

परंतु सायंकाळच्या सत्रात शहरासह वैरागमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बार्शीकरांची चिंता वाढली आहे.

No comments:

Post a Comment