संकटांचा सामना करण्यासाठी छत्रपतींचा आदर्श घ्या : धैर्यशील मोहिते पाटील - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ९ जून, २०२०

संकटांचा सामना करण्यासाठी छत्रपतींचा आदर्श घ्या : धैर्यशील मोहिते पाटील


टीम मंगळवेढा टाईम्स । शिवराज्याभिषेक सोहळ्या नंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले ही सोप्पी वाटणारी गोष्ट नव्हती इतिहासातील सभासदांच्या बखरीत मध्ये मराठा राजा छत्रपती जाहला हि गोष्ट सामान्य जाहली नाही चार ही बाजूने संकटे चालून येत असताना देखील शिवाजी महाराजांनी स्वराज्य रयतेचे राज्य उभा करण्यासाठी अपार कष्ट घेतले. स्वराज्यावर अनेक अस्मानी संकटा बरोबरच सुलतानी संकटे आले.

मोठ्या जिद्दीने मेहनतीने आणि संयमाने न डगमगता आलेल्या संकटावर मात करत शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभारले व छत्रपती झाले. आपण सर्व कोरोना संकटाचा सामना करत आहोत परंतू शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येक नागरिकांनी घ्यावा व कीती ही मोठे संकट आले तरी धीराने नेटाने संयमाने सामना करावा असे प्रतिपादन भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

जोपर्यंत आशावाद जिवंत आहे तोपर्यंत लढण्याची जिद्द कमी होता कामा नये , सगळेच युध्द सीमेवर लढले जात नाहीत काही संयम ठेऊन लढावे लागतात आणि हे कोरोना वायरस विरोधातील युद्धात आपल्या सर्वांना संयमाने मुकाबला करायचा आहे सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत केले पाहीजे हे आपल कर्तव्य आहे हे युद्ध लॉकडाऊन पूरते मर्यादित नाही आपण जो पर्यंत या लढ्यात जिंकत नाही तो पर्यंत सर्वांनी संयम ठेऊन दैनंदिन जीवनात फीजिकल सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पालन करा.


संशयितांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे . त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे व प्रतिबंधात्मक बाबी पाळणे गरजेचे आहे.सर्दी , खोकला , ताप आणि श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होत असेल तात्काळ डॉक्टरांकडे जाणेच योग्य राहील . आपण आपल्यापरीने या आजाराची काळजी घेऊ शकतो. कोरोना बद्दलच्या अधिकृत माहितीसाठी सोशल मीडियावरील फोरवर्डेड मेसेजवर अवलंबून न राहता सरकारच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा. ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या बातम्यांपासून , व्हॅट्सऍप फॉरवर्ड्स पासून दूर राहूया.

सध्याच्या परिस्तिथीत काही असेल तर ते म्हणजे स्वतःची आणि आपल्या प्रिय जणांची काळजी घेत कोरोना संकटाचा सामना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन संयमाने लढूया .

Follow Chhatrapati's example to face adversity: Patient Mohite Patil

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा