Solapur । संसर्ग पसरवण्याचे घातक कृत्य केल्याप्रकरणी 'त्या' व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २ जून, २०२०

Solapur । संसर्ग पसरवण्याचे घातक कृत्य केल्याप्रकरणी 'त्या' व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल


टीम मंगळवेढा टाईम्स । बार्शी येथील व्यापाऱ्याच्या कारखान्यात जामगाव येथील महिला कामास होती. तिचा अहवाल कोरोना बाधित आल्यानंतर कारखान्याच्या व्यापाऱ्याने आरोग्य, पोलिस प्रशासनास सहकार्य केले नाही. संसर्ग पसरवण्याचे घातक कृत्य केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विजय गुंदेचा (खांडवीकर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.पोलिस श्रीमंत खराडे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 30 व 31 मे रोजी घडली.

विजय गुंदेचा यांचा लातूर रस्त्यालगत कारखाना असून तिथे जामगाव येथील महिला कामगार आहेत. एक महिलेला त्रास झाल्यानंतर तपासणी केली असता तिचा अहवाल कोरोनाबाधित आला. या घटनेनंतर आरोग्य, पोलिस पथकाने गुंदेचा यांना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित राहण्यासाठी समज दिली. परंतु, ते उपस्थित झाले नाहीत.


आरोग्य पथक पोलिस बंदोबस्तांत गुंदेचा यांच्या कासारवाडी रस्त्यालगतच्या शांतीकुंज बंगला येथे ऍम्ब्युलन्स घेऊन गेले. परंतु, गुंदेचा यांनी येण्यास नकार देत दुचाकीवर ग्रामीण रुग्णालयात हजर झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केले; परंतु ते थांबले नाहीत. दुसऱ्या दिवशी पथक त्यांच्या कुटुंबास होम क्वारंटाइन करण्यास गेले असता ते घरी होते. गुंदेचा यांनी घरातील व्यक्ती व इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये याची दक्षता घेतली नाही.


संसर्ग पसरवण्याची घातक कृती केली, व्यक्तिगत सुरक्षा धोक्‍यात येईल असे कृत्य केले, तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.


Filed a case against barshi trader for the dangerous act of spreading the infection

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा