शेतकरी,व्यापारी आर्थिक विवंचनेत ; पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा : समाधान आवताडे - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

शेतकरी,व्यापारी आर्थिक विवंचनेत ; पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा : समाधान आवताडे


समाधान फुगारे । कोरोना प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधानजी आवताडे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. Farmers, traders in financial deprivation;  Discussion with party leader Devendra Fadnavis: samadhan awatade

यावेळी समाधान आवताडे व देवेंद्र फडवणीस यांची पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली.
तसेच जिल्हा परिषद सोलापूर मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती समाधान आवताडे यांनी देवेंद्र फडवणीस यांना दिली.

चेअरमन समाधान आवताडे यांच्या वतीने  देवेंद्रजी फडवणीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने चेअरमन समाधान आवताडे यांच्या मागणी नुसार ६५ एकर मध्ये प्रशासनाने कोविड हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला पण कोविड हॉस्पिटल निर्मितीचे काम अत्यंत संत गतीने सुरु असून त्याकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

तसेच कोरोनाचाचा प्रादुर्भाव आणि वारी रद्द झाल्या कारणाने पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील विविध व्यापारी आणि शेतकरी हे आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या करिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळ्या पॅकेजची मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाषजी देशमुख, माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, खा.रणजितसिह नाईकनिंबाळकर, जयसिध्देश्वर स्वामी, महाराष्ट्रा राज्य सहकार बॅंकेचे संचालक अविनाशजी महागावकर, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सचिन कल्यानशेट्टी,भाजप सोलापूर जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, नवनियुक्त विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,  लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन व फॅबटेक शुगरचे चेअरमन सरोजभाई काझी व इतर मान्यवर उपस्थित होते.No comments:

Post a Comment