मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने उद्योजक गोविंद घाडगे यांचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने उद्योजक गोविंद घाडगे यांचा मृत्यू


टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील रामकृष्ण ट्रेडर्सचे मालक गोविंद गोपाळ घाडगे यांचे सोमवार दि.8 जून रोजी सकाळी 11 वाजता विजेच्या धक्क्याने निधन झाले.

मृत्यूसमयी ते 49 वर्षाचे होते. त्यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, एक  भाऊ, तीन बहिणी, एक मुलगा असा परिवार आहे.


घाडगे हे सरकारी गोडावून पाठीमागे असणार्‍या त्यांच्या रामकृष्ण ट्रेडर्स या हार्डवेअर दुकानासमोर आलेला माल क्रेनच्या सहाय्याने उतरवून घेत होते त्यावेळेस क्रेनचा स्पर्श विजेच्या तारांना झाला व याच वेळी घाडगे यांचा चुकून क्रेनला स्पर्श झाला व त्यातच त्यांचे निधन झाले. सुदैवाने या क्रेनच्या स्टेरिंगला प्लास्टिक कव्हर असल्यामुळे क्रेन चालक बचावला मात्र यात गोविंद घाडगे यांचा मृत्यू झाला.


घटनेनंतर त्यांना जवळच असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Entrepreneur Govind Ghadge dies in electric shock on Tuesday

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा