पंढरपूरात सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २ जून, २०२०

पंढरपूरात सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय रक्तदान शिबिरटीम मंगळवेढा टाईम्स । सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजविलेला आहे. दररोज अनेक रूग्ण वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी वारंवार नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या युवक नेत्या आमदार प्रणितीताई शिंदे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आवाहनानुसार आज सोमवार दि.1 जून रोजी पंढरपूर येथील उमा महाविद्यालय जवळ असलेल्या ब्लड बँकमध्ये सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय रक्तदान शिबीर घेण्यात आले. सदरच्या रक्तदान शिबीरास अतिशय उत्साही वातावरणात  सुरुवात झाली.

यावेळी  उद्घाटनाचे कोणतेही सोपस्कार पार न पाडता जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी स्वतः रक्तदान करून उद्घाटन केले. यावेळी तरुणांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट/पाण्याचा जार भेट देण्यात आला. यामध्ये सुमारे 145 नागरिकांनी रक्तदान केले.

तरुणांचा प्रतिसाद बघता उद्या मंगळवार दि.2 जून रोजी ही रक्तदान शिबिर चालू ठेवण्यात येणार असल्याचे नितीन नागणे यांनी सांगितले.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाचे सोपस्कार न पाडता  स्वतः रक्तदानाने केली सुरूवात
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून त्याचा डामडौल न करता व उद्घाटनाचे कोणतेही सोपस्कार पार न पाडता जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी स्वतः रक्तदान करून सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.
District level blood donation camp on behalf of Solapur District Youth Congress in Pandharpur

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा