वेषांतर करून कृषिमंत्री दादा भुसे यांनी खत विक्रेत्यावर छापा - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

वेषांतर करून कृषिमंत्री दादा भुसे यांनी खत विक्रेत्यावर छापा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । खतविक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी वेषांतर करून रविवारी (२१ जून) उघडकीस आणली. विक्रेत्याने खत देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शेतकऱ्याच्या वेषात गेलेले भुसे यांनी स्वत:ची ओळख सांगून अधिकाऱ्यांना दुकान तपासणीचे आदेश दिले. दुकानात मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा आढळल्यानंतर विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याचबरोबर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकासा सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी  दिली. Disguise of Agriculture Minister and print on fertilizer seller

खत खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. Farmers are barred from buying fertilizer एका खतावर दुसरे खत किंवा बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येते. युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत आहे, अशा तक्रारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यांची सत्यता पडताळणीसाठी कृषिमंत्री मालेगाव येथून आज दुपारी दीडच्या सुमारास थेट औरंगाबादमध्ये आहे. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर मोठा बागायतदार रुमाल बांधला.

एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून ते दुपारी दोनच्या सुमारास जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स या दुकानात पोचले. सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी दुकानदाराकडे युरिया खताची मागणी केली, परंतु खत उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रेत्याने दिले. 'दहा नसतील तर, किमान पाच बॅग तरी युरिया द्या,' अशी विनंती त्यांनी केली.

तब्बल अर्धा तास ते विक्रेत्याची खतासाठी विनवणी करीत होते, परंतु विक्रेत्यांकडून, 'खत उपलब्ध नाही,' हेच उत्तर येत होते. त्यावेळी भुसे यांनी,'फलकावर खताचा साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे,' अशी विचारणा केली. त्यावर विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुकानात अनागोंदी आहे, हे लक्षात आल्यावर कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले.

अन् विक्रेता झाला हैराण

सर्वसामान्य शेतकरी म्हणून युरिया खरेदीसाठी आलेल्या भुसे यांनी कृषी अधिकारी दाखल होताच आपले खरे रूप उघड केले. त्यामुळे संबंधित दुकानदार, तेथील कर्मचाऱ्याला आणि कृषी अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.

युरियाचा मोठा साठा आढळला

कृषी अधिकारी दाखल होताच कृषिमंत्र्यांनी त्यांना फैलावर घेत दुकान आणि विक्रेत्याच्या सात गोदामांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरियाची १ हजार ३८६ पोती शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यालाही सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या. दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कारवाई करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या.

राज्यभरातील कृषी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये. शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतले जाणार नाही, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला.

No comments:

Post a Comment