देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात प्रशासनाच्या कामांचा घेणार आढावा - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात प्रशासनाच्या कामांचा घेणार आढावा


मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis बुधवारी सोलापुरात येत आहेत, अशी माहिती भा.ज.पा.चे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली. Devendra Fadnavis will review the work of administration in Solapur on Wednesday
 
देशमुख म्हणाले, देशामध्ये राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या काही भागातील यंत्रणा कोलमडून पडली आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. बुधवारच्या दौर्‍यात ते सोलापूर आणि उस्मानाबादमध्ये असणार आहेत. सोलापुरात आल्यानंतर ते प्रशासनाच्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत.

याचवेळी अधिकार्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. फिजीकल डिस्टन्सिंगचा विचार करुनच सर्व कार्यक्रमांची रुपरेषा आखली जात आहेत.

No comments:

Post a Comment