मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील अश्‍विनी धनाजी इटकर (वय 25) या विवाहितेचा गर्भपातासह मूल बंद होण्याची शस्त्रक्रिया करीत असताना मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे. The viscera of the woman who died during the surgery was sent to the testing laboratory

दरम्यान,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी या महिलेचा व्हिसेरा राखून ठेवला असून अधिक तपासणीसाठी सोलापूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असल्याचे ग्रामीण रुग्णालय सुत्रांकडून सांगण्यात आले.

यातील मयत अश्‍विनी इटकर हिचा गर्भपातासह मूल बंद होण्याची शस्त्रक्रिया करणेकामी हॉस्पीटलमध्ये तीच्या कुटुंबियांनी  दाखल केले होते.दि.19 रोजी दुपारी 2.45 वा.शस्त्रक्रिया गृहामध्ये महिलेला भूल दिल्यानंतर तीच्यावर गर्भपात करण्याची प्रक्रिया करीत असताना सदर महिलेचा रक्तदाब कमी झाल्याने ती बेशुध्दावस्थेत गेल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.शस्त्रक्रिया करण्यापुर्वी दिलेल्या भूलीच्या इंजेक्शनबाबत शंका व्यक्त होत असून याची तपासणी पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

पोलिसांनी नवरा व मयताची आई यांचा जबाब नोंदविला आहे.मयताच्या गर्भाशयातील गर्भ हा पाच आठवडयाचा असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.गर्भाशयाला गाठ असल्यामुळे त्याच्या त्रासापोटी गर्भ खाली करण्याचा सल्ला दिल्याने शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया सुरु होती.मयत ही दवाखान्यात दाखल होण्यापुर्वी स्वतः पायी चालत आली होती. मात्र ती शस्त्रक्रिया करताना अचानक बेशुध्द कशी काय पडली ? असा सवाल विचारला जात आहे.

याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.मयतास एक मुलगा,एक मुलगी आहे. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी उपचार फाईल ताब्यात घेतली आहे.तरूण विवाहितेचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात या निष्क्रीयपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे.योग्य कारवाई झाली तरच त्या मृत महिलेच्या आत्म्याला न्याय मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.

Demand for action against the doctor who showed negligence in the case of the woman's death

No comments:

Post a Comment