महाराष्ट्रातील यंदाची दहीहंडी करोनामुळे रद्द - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

महाराष्ट्रातील यंदाची दहीहंडी करोनामुळे रद्द


तात्यासो कोंडूभैरी । मुंबई करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय  Dahihandi Coordinating Committee दहीहंडी समन्वय समितीतर्फे बुधवारी (महाराष्ट्र) घेण्यात आला. Shrikrishna Birth Ceremony (Ashtami Pooja) श्रीकृष्ण जन्मसोहळा (अष्टमीची पूजा) साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सुरक्षित वावराबाबतचे नियम यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

मागील अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. मात्र राज्यभरातील गोविंदा पथके आणि समन्वय समितीच्या लढ्याअंती दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा करोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सवाबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांचे लक्ष समन्वय समितीच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र यंदाच्या वर्षी करोनामुळे राज्याचे स्वास्थ्य बिघडले असताना दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला.

करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशावेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोऱ्यांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार असे अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले.

तसेच या खेळाचे आयोजन केल्यास यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती समितीच्या वतीने बाळा पडेलकर यांनी दिली.

This year's Dahihandi in Maharashtra was canceled due to Corona

No comments:

Post a Comment