चित्रपट निर्माते अनिल सूरी यांचे कोरोनाने निधन ; बॉलिवूडला धक्के सुरुच - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ६ जून, २०२०

चित्रपट निर्माते अनिल सूरी यांचे कोरोनाने निधन ; बॉलिवूडला धक्के सुरुच


टीम मंगळवेढा टाईम्स । कर्मयोगी, बेगुनाह आणि राज तिलक यांसारख्या चित्रपटांचे निर्माते अनिल सूरी यांचे कोरोनाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. अनिल सूरी यांचे भाऊ राजीव सूरी यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. राजीव यांच्या माहितीनुसार, अनिल सुरी यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होता आणि त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करम्यात आले. परंतु, अनेक रूग्णालयांनी अनिल सूरी यांना भर्ती करून घेण्यास नकार दिला होता, असा आरोप राजीव यांनी केला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना राजीव सूरी म्हणाले की, 'अनिल सूरी यांना दोन जूनला ताप आला होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांनी लीलावती आणि हिंदुजा यांसारख्या रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांना तेथे दाखल करून घेण्यास रूग्णालयांनी नकार दिला होता.'

राजीव पुढे म्हणाले होते की,  'मोठ्या रूग्णालयात बेड न मिळाल्याने त्यांना म्युनिसिपालिटीच्या रूग्णालयात बुधवार रात्री दाखल करण्यात आले. ते कोरोनाने बाधित होते. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान, शुक्रवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनिल सूरी 'कर्मयोगी' चित्रपटाचे निर्माते होते. हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये राज कपूर, जितेंद्र आणि रेखा यांच्या भूमिका होत्या. तसेच त्यांचा 'राज तिलक' चित्रपटदेखील लोकप्रिय ठरला. या चित्रपटामध्ये सुनील दत्त, राज कुमार, हेमा मालिनी, धर्मेंद्र, रीना रॉय, सारिका आणि कमल हासन यांच्या भूमिका होत्या.

Coroner Anil Suri dies;  Bollywood continues to push

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा