सोलापूर कोरोना ब्रेकिंग : 'या' शहरात सापडला पहिला रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 28, 2020

सोलापूर कोरोना ब्रेकिंग : 'या' शहरात सापडला पहिला रुग्ण


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.एका खासगी सहकारी बँकेचा संचालक असणारा हा रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे.
( Corona positive patient found in Pandharpur city. )


एका मोठ्या प्रशालेत ते शिक्षक देखिल आहेत. चार दिवसांपूर्वीच एका डॉक्टरी पेशाच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णाची तपासणी केली होती.

कोरोनाचा चाचणीसाठी एकूण 47 जणांचे स्वब घेतले होते.त्यापैकी आज 39 अहवाल प्राप्त झाले असून 2 (करकंब 1, पंढरपूर 1 )व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.तर 36  नेगिटिव्ह आले आहेत.व 1 निकृष्ट दर्जा , 8 अहवाल अजून प्रतेक्षित आहेत.

या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री सध्यातरी फक्त मंगळवेढाच दाखवत आहे.प्रदक्षिणा मार्गावरील हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे.


छातीमध्ये कफ आणि ताप असल्याने या रुग्णाचे स्वब घेतले होते.आषाढी यात्रेच्या दोनच दिवस अगोदर शहरात रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढलीय.पंढरपूर शहरातील हा पहिलाचा रुग्ण आहे.

दरम्यान करकम्ब येथील एका रुग्णास कोरोना पॉजीटीव्ह असल्याचे निदान झाले असून ठाणे येथून आलेल्या या व्यक्तीला सध्या mit कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे.आषाढी च्या तोंडावर पंढरीत कोरोना पॉजीटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment