कोरोना रूग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा : संदिप मुटकुळे - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 21, 2020

कोरोना रूग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा : संदिप मुटकुळे


मंगळवेढा टाईम्स टीम । कोरोना रूग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा. इतर आजाराबाबत खाजगी रुग्णालयाने दरपत्र निश्चितच करावे. शेतक-यांना बी.बियाणे त्वरित उपलब्ध करावीत. मनरेगाची कामे सुरू करावीत यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.नोंदणीकृत बांधकाम कामगारांची नुतनीकरणाची अट शिथील करून त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे.कोरोना हे जगावर आलेले संकट आहे. Corona patients should get the benefit of Mahatma Phule Jeevandayi Yojana: Sandeep Mutkule

त्यामुळे कोरोनाग्रस्तांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळावा.कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांचेच फक्त चेकअप केले जाते.तसे न करता आजूबाजूच्या लोकांचेही चेकअप करावे.परिसर सील करावा.कंटेन्मेट झोनचा सर्वे करून वृद्धांना प्रतिकारशक्तीच्या गोळ्या वाटाव्यात.आशा वर्कर तटलेले मानधान त्वरित मिळावे.

इतर आजाराबाबत खाजगी रुग्णालयाने दरपत्र निश्चितच करावे.जिल्ह्यात काही ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू केली आहेत.पण ज्या तालुक्यात मका केंद्र सुरू नाहीत.त्या तालुक्यात मका केंद्र सुरू कराव्यात. सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करावे.

ज्या शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्या शेतक-यांना विना कवच जाहीर करावे.पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्व बँकांना घ्याव्यात.जिल्ह्यातील रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पार्श्वभूमीवर साथीच्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेतील आणि ग्रामीण भागातील गटारी नाल्यांची साफ सफाई करावी.

जंतूनाशक औषधांची फरवारणी करावी.तसेच शहरातील सर्व नागरिकांचा कर व घरगुती वीज बिल आणि शेतकरी यांचे पण लाईट बिल माफ करावे.आदी मागण्या विकास आघाडी सरकाराचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केली आहे.असे प्रसिध्द पत्रकामध्ये शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहेत.

No comments:

Post a Comment