धक्कादायक : सोलापुरात आज 9 जणांचा बळी तर 90 नव्या रुग्णांची भर - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

धक्कादायक : सोलापुरात आज 9 जणांचा बळी तर 90 नव्या रुग्णांची भर


मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर महापालिकेच्या हद्दीत आज नव्याने 90 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 55 पुरुष तर तर 35 महिलांचा समावेश आहे. कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. सापडलेल्या 90 कोरोनाबाधित रुग्णांमुळे सोलापूर शहर परिसरातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 1844 झाली आहे. Corona kills 90 new positives in Solapur city

महापालिका हद्दीतील 154 व्यक्तींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवार पेठ परिसरातील 71 वर्षीय पुरुषाला 6 जून रोजी सीएनएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दक्षिण कसबा परिसरातील 60 वर्षीय महिलेला 15 जून रोजी सीएनएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 18 जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. न्यू पाच्छा पेठ परिसरातील 67 वर्षीय पुरुषाला 10 जून रोजी सीएनएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान 17 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. साखरपेठ परिसरातील साठ वर्षीय पुरुषाला 15 जून रोजी गंगामाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 18 जून रोजी सहाच्या दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. एमआयडीसी परिसरातील 75 वर्षीय महिलेला 16 जून रोजी सीएनएस रुग्णालयात दाखल केले होते. 18 जून रोजी रात्री दीड वाजता त्यांचे निधन झाले आहे. पश्‍चिम मंगळवार पेठ परिसरातील 90 वर्षीय पुरुषाला 9 जून रोजी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे.

उत्तर कसबा परिसरातील 75 वर्षीय महिलेला 8 जून रोजी सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 18 जून रोजी त्यांचे निधन झाले आहे. सम्राट चौक परिसरातील 74 वर्षीय पुरुषाला 10 जून रोजी सीएनएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता त्यांचे निधन झाले आहे. रविवार पेठ परिसरातील 70 वर्षीय महिलेला 15 जून रोजी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जून रोजी दुपारी अडीच वाजता त्यांचे निधन झाले आहे.

कोरोना चाचणीचा एकही अहवाल आता प्रलंबित नसून सर्वचे सर्व अहवाल तपासले आहेत. आज दिवसभरात 340 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 250 निगेटिव्ह आले आहेत तर 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

No comments:

Post a Comment