सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचे संकट वाढले ; 7 नव्या रुग्णांची भर - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ७ जून, २०२०

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचे संकट वाढले ; 7 नव्या रुग्णांची भरसमाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आज ग्रामीण भागात 7 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 80 वर पोहचली आहे. नव्याने कोरोना बाधीत म्हणून सापडलेले 6 रुग्ण हे आर.पी.एफ. ऑफिस कुर्डुवाडी ता.माढा येथील असून 1 वळसंग ता.दक्षिण सोलापूर येथिल आहेत.

माढा तालुक्यात 8 तर बार्शी तालुक्यातील 18 रुग्ण , दक्षिण सोलापूर मध्ये सर्वाधिक 29 रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत 80 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळले असून यामध्ये 53 पुरुष तर 27 महिलांचा समावेश आहे. आजअखेर 6 जनांचा (पु-3 व 3 स्त्री) बळी कोरोनाने घेतले आहेत. तर आत्तापर्यंत 6 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत.आज एकूण 80 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून आलेले सातही रुग्ण पुरुष आहेत. कुर्डुवाडी येथील आर. पी. एफ. ऑफीस येथील कार्यालयातील हे सहाही रुग्ण आहेत. वळसंग येथील एक रुग्ण हा सारीचा आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 68 इतकी आहे. आतापर्यंत सहा जण मृत पावले आहेत. त्यापैकी तीन पुरुष तर तीन स्त्रियांचा समावेश आहे. सध्या दोन हजार 983 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. अद्यापही 71 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून सहा जण बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये पाच पुरुषांचा तर एका स्त्री चा समावेश आहे.

कोरोना बाधितांची तालुकानिहाय संख्या 

अक्कलकोट-8, बार्शी-18, माढा-7, माळशिरस-2, मोहोळ-4, उत्तर सोलापूर-2, पंढरपूर-सात, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-29, एकूण-80. कोरोनाची लागण झाल्याने आणि दिवसागणिक ही संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याचे यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे.

solapur Corona crisis escalates in rural areas Addition of 7 new patients
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा