धोका वाढतोय : सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची भर ; संख्या 82 वर - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

धोका वाढतोय : सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची भर ; संख्या 82 वरटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आज ग्रामीण भागात 2 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 82 वर पोहचली आहे. नव्याने कोरोना बाधीत म्हणून सापडलेले 1 रुग्ण हा जमगाव ता.बार्शी तर दुसरा नवीन विडी घरकुल ता.दक्षिण सोलापूर येथिल आहे.
माढा तालुक्यात 7 तर बार्शी तालुक्यातील 19 रुग्ण , दक्षिण सोलापूर मध्ये सर्वाधिक 30 रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत 82 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळले असून यामध्ये 53 पुरुष तर 29 महिलांचा समावेश आहे. आजअखेर 6 जनांचा (पु-3 व 3 स्त्री) बळी कोरोनाने घेतले आहेत. तर आत्तापर्यंत 31 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत.आज एकूण 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 6 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाची लागण झाल्याने आणि दिवसागणिक ही संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याचे यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे.

solapur Corona crisis escalates in rural areas Addition of 2 new patients
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा