सोलापुरात कोरोनाने झालेले 40 मृत्यू लपवले ; रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

सोलापुरात कोरोनाने झालेले 40 मृत्यू लपवले ; रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीसमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरातील कोरोना रोखण्यात सोलापूर महापालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मे अखेरीस व जूनच्या सुरुवातीस सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची नोंदच महापालिका दप्तरी नसल्याने सोलापूरच्या आकडेवारीत व राज्याच्या आकडेवारी तफावत दिसत होती. ही माहिती भरण्यामध्ये मिस्टेक झाल्याची कबुली  Solapur Municipal Commissioner P.  Shivshankar  सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कोरोनामुळे मृत पावलेल्या तब्बल 40 व्यक्तींची नोंद आज महापालिकेच्या दरबारी झाली आहे. Corona hides 40 deaths in Solapur;  Show cause notice to hospitals

सोलापूर शहरातील 213 व्यक्तींचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबतची स्वतंत्र पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या माहिती व पडताळणी आम्ही दोन दिवसांपासून करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ज्या रुग्णालयात कोरोनबाधिताचा मृत्यू झाला आहे त्याच रुग्णालयाने शासनाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती अपलोड करणे बंधनकारक असताना सोलापुरातील रुग्णालयांनी ही माहिती अपलोड केली नाही.

ही माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती त्याने जबाबदारीने काम केले नसल्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हॉस्पिटलची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिले होते तो कर्मचारीच आजारी पडला. महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रूममध्ये काम करणारा व्यक्ती कोरोना बाधित झाला.

दरम्यानच्या काळात महापालिकेचे आरोग्य अधिकारी बदलले या सर्व कारणांमुळे ही माहिती भरता आली नसल्याची कबुली महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी (ता. 21) रात्रीपर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची अधिकृत संख्या 170 एवढी होती. आज त्यामध्ये जुन्या चाळीस व्यक्तींची अधिकृत नोंद झाली आहे. कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने सोलापूर शहरातील 213 व्यक्तींचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील अकरा व्यक्तींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील 224 व्यक्तींचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व अश्विनी रुग्णालय यासह इतर लहान रुग्णालयाकडे कोरोनाच्या मृत व्यक्ती बाबत माहिती प्रलंबित होती. ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. माहिती संकलित करण्यामध्ये व माहिती देण्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment