सोलापुरात कोरोनाबाधितांचे मृत्यू थांबेनात ; बुधवारी 6 बळी तर 25 नव्या रुग्णांची भर - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

सोलापुरात कोरोनाबाधितांचे मृत्यू थांबेनात ; बुधवारी 6 बळी तर 25 नव्या रुग्णांची भर


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2 हजार 37 झाली आहे. तर दुसरीकडे मृत्यूची संख्या कमी होईल, हा विश्‍वास पुन्हा एकदा फोल ठरत बुधवारी 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे 40 वर्षाच्या आतील दोन व्यक्‍ती, ज्या 15 दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. त्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील 148 जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी 25 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. कोरोनाबाधितांची संख्या मागील तीन दिवसांत कमी झाली असून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण चांगले आहे. मात्र, मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोलापुकरांची चिंता वाढली आहे.

'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण

भवानी पेठ, विद्या नगर, उत्तर सदर बझार, जुना विजापूर नाका, अभिषेक नगर, आनंद नगर, टिळक चौक, गंगा नगर, अन्नुविश्‍व हौसिंग सोसायटी, एन.जी. मिल, उमा नगरी, दर्शराम रेसिडेन्सी,भद्रावती पेठ, शांती चौक, इंदिरा नगर, कर्णिक नगर, उत्तर सदर बझार, चाटला साडी सेंटरजवळ,सिध्देश्‍वर पेठ, पवन नगर, मुळेगाव रोड,आशा नगर, एमआयडीसी रोड, गवळी वस्ती, आकाशवाणी रोड, सरवदे नगर, मुळेगाव रोड याठिकाणी बुधवारी 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

सोलापूर शहरात आतापर्यंत 224 व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या कमी होईल अशी सोलापुकरांची अपेक्षा बुधवारी (ता. 24) पुन्हा फोल ठरली. मुरारजी पेठेतील 70 वर्षीय महिला, भारतरत्न इंदिरा नगरातील 70 वर्षीय महिला, भवानी पेठेतील 85 वर्षीय, अभिषेक नगरातील 61 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर धक्‍कादायक बाब म्हणजे सिध्देश्‍वर पेठेतील 40 वर्षीय पुरुष 9 जूनला दाखल झाला होता. तर पाथरुट चौकातील 45 वर्षीय व्यक्‍ती 7 जूनला दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Corona deaths do not stop in Solapur,On Wednesday, 6 victims and 25 new patients were added


No comments:

Post a Comment