TikTok सह 'या' 52 चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ; जाणून घ्या त्यांची नाव - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

TikTok सह 'या' 52 चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ; जाणून घ्या त्यांची नाव



टीम मंगळवेढा टाईम्स । भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ॲपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. 

या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. यामध्ये Tik-Tok, Helo, UC Browser आणि Zoom अशा ॲप्सचा समावेश आहे. 52 Chinese app with TikTok is a threat to India's security शिवाय चीनमधील शॉपिंग ॲप Shien आणि Xiaomi देखील सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

यासंबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. Tik-Tok, Helo, UC Browser या ॲप्सचा युझर्स आपल्या मनोरंजनासाठी वापर करतात. परंतु हे सर्व ॲप्स तुमच्या फोनची लोकेशन आणि महत्त्वाची माहिती हस्तगत करते. शिवाय ॲप्सच्या माध्यमातून हस्तगत केलेली सर्व माहिती चिनी कंपन्यांनी चीन सरकारला पुरवणे बंधनकारक असते.

या माहितीच्या सहाय्याने चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी सैन्य देशावर हल्ला करण्याची रणनीती आखू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या ॲप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे.

ही चिनी ॲप्स तुमच्या फोनमध्ये आहेत का?
  1. TikTok
  2. Vault-Hide
  3. Vigo Video
  4. Bigo Live
  5. Weibo
  6. WeChat
  7. SHAREit
  8. UC News
  9. UC Browser
  10. BeautyPlus
  11. Xender
  12. ClubFactory
  13. Helo
  14. LIKE
  15. Kwai
  16. ROMWE
  17. SHEIN
  18. Zoom
  19. NewsDog
  20. Photo Wonder
  21. APUS Browser
  22. VivaVideo- QU Video Inc
  23. Perfect Corp
  24. CM Browser
  25. Virus Cleaner (Hi Security Lab)
  26. Mi Community
  27. DU recorder
  28. YouCam Makeup
  29. Mi Store
  30. 360 Security
  31. DU Battery Saver
  32. DU Browser
  33. DU Cleaner
  34. DU Privacy
  35. Clean Master - Cheetah
  36. CacheClear DU apps studio
  37. Baidu Translate
  38. Baidu Map
  39. Wonder Camera
  40. ES File Explorer
  41. QQ International
  42. QQ Launcher
  43. QQ Security Centre
  44. QQ Player
  45. QQ Music
  46. QQ Mail
  47. QQ NewsFeed
  48. SelfieCity
  49. Clash of Kings
  50. Mail Master
  51. Mi Video call-Xiaomi

No comments:

Post a Comment