खबरदारी : 'या' जिल्ह्यात बुधवारी अतिवृष्टीची शक्यता - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २ जून, २०२०

खबरदारी : 'या' जिल्ह्यात बुधवारी अतिवृष्टीची शक्यता


टीम मंगळवेढा टाईम्स । सांगली, मुंबई,नाशिक, रत्नागिरी,कोल्हापूरसह  धुळे आणि नंदुरबार भागांत येत्या बुधवारी आणि गुरुवारी (3 व 4 जून) अतिवृष्टीचा इशारा दिल्ली च्या हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.या दोन दिवसात 204.5 टक्के पाऊस पडेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

मान्सून मंगळवारी कोकण, गोवा भागात दाखल होत आहे, पण त्या पाठोपाठ मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिल्ली हवामान विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सुनीता देवी यांनी एका विशेष रिपोर्ट द्वारे दिला आहे.यात म्हटले आहे की,अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍याचा वेग प्रचंड वाढला आहे. गुजरात मधून कोकणात चक्रीवादळ केरळात चक्रीवादळ  येईपर्यंत या वार्‍यांचा वेग ताशी 65 ते 85 किमी राहणार आहे.पण हे वारे गुजराथकडे जाताना त्याचा वेग 90 ते 100किमी वेगाने होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल.गुजराथ किनार पट्टीवर हे चक्रीवादळ 3 जून ला धडकणार आहे.

गुजरात किनारपट्टी मार्गे हे चक्रीवादळ मुबंई,नवी मुंबई, नाशिक, रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे भागातही येऊ शकेल.तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे,नंदुरबार भागात जाईल.या वादळामुळे 204.5टक्के पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. या अहवालाच्या प्रति महाराष्ट्र व गुजरात राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत.असाच पाऊस मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये पुणे ,कोल्हापूर,सांगली,सातारा भागात सुमारे 200 टक्के इतका झाला होता.

Chance of heavy rain in sangali district on Wednesday

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा