केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत लोकांच्या परिवारास मदत जाहीर करावी : संदिपराजे मुटकुळे - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ७ जून, २०२०

केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत लोकांच्या परिवारास मदत जाहीर करावी : संदिपराजे मुटकुळे


राजेंद्र फुगारे । केंद्र सरकारने कोरोना संक्रमित होऊन मृत लोकांच्या परिवारास आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की,सध्या देशात कोरोना या विषाणूने घातलेला थैमान पाहता यामध्ये काही ना काही प्रमाणात केंद्र सरकारच्या प्रशासनाचे अपयश असल्याचे आपणांस मान्यच करावे लागेल. त्याला अनुसरुन या दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे,त्यांच्या परिवाराची दिलगिरी व्यक्त करुन आर्थिक मदत करणं केंद्र सरकारची जबाबदारी आहे.तरी केंद्र सरकार ही जबाबदारी स्वीकारून कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या परिवारास आर्थिक मदत जाहीर करून वितरीत कराल अशी विनंती करण्यात आली आहे.

या पत्राच्या प्रति खा.शरदचंदजी पवार,खा.सुप्रियाताई सुळे,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Central government should announce help to families of people killed by corona: Sandiparaje Mutkule

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा