राज्यातील आशा सेविकांसाठी खुशखबर, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

राज्यातील आशा सेविकांसाठी खुशखबर, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यभरात तळागळातील भागामध्ये जात आरोग्यसेवा पुरवण्याचे महत्वाचे काम ‘आशा’सेविका यांच्याकडून केले जाते. कोरोनाच्या कठीण काळामध्ये देखील त्यांनी आपले काम अविरतपणे सुरु ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटकरत ही Health Minister Rajesh Tope माहिती दिली आहे. Good news for Asha Sevikans in the state, Thackeray government took 'yes' decision


राज्यातील सर्व आशा भगिनीच्या मानधनात २ हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात ३ हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचे १२ निर्णय घेण्यात आले आहेत. चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात फळबागांच्या लागवडी रोजगार हमी योजनेतून करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तयार झालेल्या परिस्थितीचा सामना करत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी करण्याचंही निश्चित करण्यात आलं.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका आणि नोकऱ्या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका आणि नोकऱ्या यावरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२०  काढण्यास मंजुरी. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, 2020 काढण्यास मंजुरी. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरु करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना लाभ होणार.

हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतकऱ्यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण – २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.कोविड-19 च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.
राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी. समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार. नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ. १ जुलैपासून आशासेविकांना ३ हजार रुपये वाढीव वेतन.एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार.गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी कराराला मान्यता. 

A permanent increase of Rs. 2,000 in the honorarium of Asha Bhagini and Rs. 3,000 in the honorarium of Asha group promoters

No comments:

Post a Comment