बार्शी तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

बार्शी तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी


टीम मंगळवेढा टाईम्स । जामगावनंतर वैराग येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय ६८ वर्षे होते आणि बार्शीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. Another victim of Corona in Barshi taluka

बार्शी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३२ च्या घरात गेली आहे. यानंतरही अनेक नागरिक बेफिकीर व निष्काळजी आहेत.

दरम्यान , कोरोना संसर्गाने सोमवारी वैराग येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याने मात्र बार्शीकर हादरले आहेत.हा दुसरा बळी गेल्याने कोरोना संसर्गाची तीव्रता पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आली आहे. वैराग येथील हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर बाशीतील एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते,

परंतु अखेर सोमवारी दुपारी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता प्रशासकीय प्रक्रियेप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने या मृत रुग्णाचा बार्शीतच अंत्यविधी केला. कोरोना विषाणू संसर्गाबाबत अद्यापही बेफिकीर असणाऱ्यांनी यापुढे तरी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

No comments:

Post a Comment