दामाजीपंत पालखी सोहळ्याची वैभवशाली परंपरा खंडीत होऊ नये ; अ.भा.वा मंडळ व संत दामाजीपंत संस्थाच्यावतीने निवेदन - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

दामाजीपंत पालखी सोहळ्याची वैभवशाली परंपरा खंडीत होऊ नये ; अ.भा.वा मंडळ व संत दामाजीपंत संस्थाच्यावतीने निवेदन


सुरज फुगारे । दामाजी पालखी सोहळ्याची वैभवशाली परंपरा खंडीत होऊ नये, अशी अखंड वारकरी संप्रदायाची Of the Akhand Warkari sect मनोमन इच्छा आहे. तरी आषाढी सोहळ्यास संत दामाजी पालखी प्रस्थान व पादुका नेणेबाबत शुक्रवार दि 19 जून रोजी अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री संत दामाजी Akhil Bharatiya Warkari Mandal and Shri Sant Damaji संस्थेच्या वतीने श्री संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सहजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. The glorious tradition of Damajipant Palkhi ceremony should not be broken


यावेळी ह,भ,प बजरंग माळी, तालुकाध्यक्ष ह,भ प निलेश गुजरे, उपाध्यक्ष ह,भ,प भिमराव पाटील, सतिश पाटील, उपनगराध्यक्ष शंकर माळी, शहरउपाध्यक्ष ह,भ,प मल्लिकार्जून राजमाने, ह,भ,प गोपाळ कोकरे ह,भ,प तुकाराम नांद्रेकर ह,भ,प धनाजी नांद्रेकर, ह,भ,प दिनानाथ नांद्रेकर,ह,भ,प दगडू ठोंबरे, ह,भ,प मारूती भगत ह,भ,प पांडुरंग घाडगे,सतिश भोसले, भाऊ जावळे, ह,भ,प अरूण बाबर, ह,भ,प रमेश माने, ह,भ,प मनोहर कट्टे, ह,भ,प अरूण सावंत, ह,भ,प आनंदराव जावळे, भिमराव सुर्यवंशी, ह,भ,प गणेश नांद्रेकर, सुरेश कुलकर्णी, मसू आवळेकर, राजाराम गावंधरे, दयानंद राजमाने, दादा ओमणे यांच्यासह अनेक वारकरी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मात्र, राज्यावरील व सोलापूर जिल्ह्यातील करोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. सोलापूर जिल्हा रेडझोनमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये, अशी असंख्य वैष्णवांची भूमिका आहे.

दामाजी पालखी सोहळ्याची Damaji Palkhi ceremony परंपरा खंडीत होणार नाही, अशी तमाम वारकर्‍यांची इच्छा आहे. तसेच या पालखी सोहळ्यात योग्य ती काळजी घेतली जाईल याची ही हमी दिली आहे. त्याला प्रतिसाद देऊन प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील, असेही  प्रमुख प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment